10
देवदूत अनं धाकली गुंडाळी
मी आखो एक सामर्थ्यशाली देवदूत स्वर्गमातीन खाली उतरतांना दखा; तो ढगसले पांघरेल अनं त्याना डोकावर मेघधनुष्य व्हता, त्याना चेहरा सूर्यनामायक, अनं त्याना पाय आगना खांब मायक व्हतात; त्याना हातमा उघडेल एक धाकलं गुंडाळी व्हती; त्यानी आपला उजवा पाय समुद्रवर अनं डावा पाय जमीनवर ठेवा, तो सिंहसना गर्जननामायक जोरमा वरडना; तवय सात मेघगर्जनासनी उत्तर दिधं. त्या सात मेघगर्जनासनी उत्तर दिधं तवय मी लिखणार व्हतु; इतलामा स्वर्गमातीन व्हयेल आवाज मी ऐका, तो बोलना; सात गर्जनासनी जे सांगं ते गुप्त ठेव, ते लिखु नको.
ज्या देवदूतले समुद्रवर अनं जमीनवर उभं राहेल मी दखं, त्यानी आपला उजवा हात स्वर्गकडे वर करीसन, जो युगानुयुग जिवत शे, ज्यानी आकाश अनं त्यामा जे शे, पृथ्वी अनं तिनावर जे शे ते, अनी समुद्र अनं त्यामा जे शे ते उत्पन्न करं, त्याना नावनी शपथ वाहीन सांगं, “आखो येळ लागाव नही! जवय सातवा देवदूत कर्णा वाजाडी, तवय देव त्यानी गुप्त योजना आपला दास, संदेष्टा यासले सांगेल व्हतं ते पुर्ण व्हई.”
स्वर्गमातीन व्हयेल जो आवाज परत मी ऐकेल व्हता तो मनासंगे परत बोलतांना मी ऐका; तो बोलना, “जा अनं समुद्रवर अनं जमीनवर उभा राहेल देवदूतना हातमाधलं गुंडाळी जाईन ले.”
तवय मी त्या देवदूतकडे जाईन, ती धाकली गुंडाळी माले दे अस सांगं, तो माले बोलना, “हाई ले अनी खाई टाक; हाई तुनं पोट कडू करी टाकी पण तुना तोंडमा ते मधनामायक गोड लागी.”
10 तवय मी देवदूतना हातमातीन ती धाकली गुंडाळी लिधं अनं खाई टाकं; ती मना तोंडमा मधनामायक गोड लागनं, तरी ते खावानंतर मनं पोट कडू व्हयनं. 11 तवय त्या माले बोलनात, “बराच राष्ट्र, लोके, भाषा अनं राजा यासनाबद्दल तू परत संदेश देवालेच पाहिजे.”