11
दोन साक्षीदार
1 नंतर मोजानी पट्टीनामायक एक बोरू कोणी तरी माले दिधा, अनी सांगं, “जा, देवनं मंदिर अनं वेदी यासनं माप ले अनी मंदिरमा आराधना करनारा कितला शेतस ते मोज.”
2 पण मंदिरना बाहेरनं माप लेवु नको, कारण ते गैरयहूदीसले देयल शे अनी त्या शेचाळीस महिना पवित्र शहर पायखाल तुडावतीन.
3 मना दोन्ही साक्षीदार ज्या गोणपाट घालेल व्हतीन त्यासले मी धाडसु अनी त्या एक हजार दोनशे साठ दिन देवना संदेश सांगतीन.
4 पृथ्वीना प्रभुसमोर उभा राहणारा जैतुनना दोन झाडं अनं दोन समई ह्या त्या दोन साक्षीदार शेतस.
5 त्यासले कोणी उपद्रव कराले दखस तर त्यासना तोंडमातीन आग निंघीन त्यासना शत्रुसले खाई टाकस, कोणी त्यासले नुकसान पोहचाडाना प्रयत्न करा तर त्यासले त्यानाप्रमाणेच मारी टाकामा येवो.
6 त्यासना संदेश सांगाना दिनसमा पाऊस पडाले नको म्हणीन आकाश बंद कराना त्यासले अधिकार देयल शे; झरासना पाणीनं रक्त कराना अधिकार त्यासले शे, अनी वाटी तवय पृथ्वीले सर्व पीडासनी पीडित कराना बी त्यासले अधिकार शे.
7 त्यासनी आपली साक्ष देणं समाप्त करावर अथांग डोहमातीन श्वापदवर ईसन त्यासनासंगे लढाई करी अनी त्यासले जिंकीन मारी टाकी.
8 अनी ज्या शहरमा प्रभुले क्रुसखांबवर खियामा येल व्हतं त्याना रस्तावर त्यासना प्रेतं पडी राहतीन त्या शहरसले प्रतिकात्मक रितघाई त्यासले सदोम अनं मिसर अस नाव सांगेल असा त्या मोठा शहर शेतस.
9 सर्वा लोकं, वंश, येगयेगळा भाषा बोलणारा अनं राष्ट्र यामाधला लोकं त्यासना प्रेतं साडेतीन दिन दखतीन अनी त्या त्यासना प्रेतले कबरमा ठेवू देवावत नही.
10 अनी त्या दोन्हीसना मरणमुये पृथ्वीवरला लोकं आनंद करतीन. त्या उल्लास करतीन अनं एकमेकसले बक्षीस धाडतीन, कारण त्या दोन्ही संदेष्टासनी पृथ्वीवर राहणारासले पीडा देयल व्हती.
11 पुढे साडेतीन दिनस नंतर जिवनना आत्मा देवपाईन ईसन त्यासनामा घुसना, तवय त्या आपला पायवर उभा राहिनात, अनी ज्यासनी त्यासले दखं त्यासले खुप भिती वाटनी.
12 तवय त्या दोन संदेष्टासनी स्वर्गमातीन निंघेल मोठा आवाज ऐका, तो बोलना, “इकडे वर या!” मंग त्या मेघारूढ व्हईसन स्वर्गमा निंघी गयात अनं त्या वर जाई राहींतात तवय त्यासले त्यासना शत्रुसनी दखं.
13 त्याच येळले मोठा भूकंप व्हयना. तवय त्या शहरना दहावा भाग नाश व्हयना, अनी सात हजार लोकं मरी गयात अनी बाकीना घाबरीन त्यासनी स्वर्गीना देवनं गौरव करं.
14 दुसरा अनर्थ व्हई गया पण तिसरा अनर्थ लवकरच यवावं शे.
सातवा कर्णा
15 नंतर सातवा देवदूतनी कर्णा वाजाडा, तवय स्वर्गमातीन मोठा आवाज वनात त्या बोलनात, “जगनं राज्य आमना प्रभुनं अनं त्याना ख्रिस्तनं व्हयेल शे, अनी तो युगानुयुग राज्य करी!”
16 तवय देवना समोर आपला आसनवर बशेल चोवीस वडील लोकं उपडा पडिन देवले नमन करीसन आराधना करीसन बोलनात,
17 “हे प्रभु देवा, हे सर्वसमर्था, जो तु शे अनं व्हता!
तो तु आपलं महान सामर्थ्य धारण करेल शे
अनी राज्य अधिकार आपला हातमा लिधात म्हणीन आम्हीन तुनां आभार मानतस.
18 राष्ट्र क्रोधित व्हईनात, तुना क्रोधनी येळ वनी;
मरेलसना न्याय करानी येळ,
अनी तुना दास, संदेष्टा अनं तुना पवित्र लोकं अनं तुना नावनी भिती धरणार धाकलामोठा असा तुना सर्वा लोके,
यासले वेतन देवानी येळ अनी पृथ्वीना नाश करनारासनी नाश करानी येळ येल शे.”
19 तवय देवना स्वर्गमाधलं मंदिर उघडामा वनं, त्याना मंदिरमा त्याना करारना कोश दखायना अनी ईजा चमकन्यात, गर्जना अनं ढगसना गडगडाट व्हयना, भूकंप व्हयना अनं मोठं गारासनी वृष्टी बी व्हयनी.