12
बाई अनी अजगर
1 नंतर आकाशमा एक महान रहस्यमय चिन्ह दखायनं; एक बाई दखायनी, ती सूर्य पांघरेल व्हती अनी तिना पायखाल चंद्र अनं तिना डोकावर बारा तारासना मुकुट व्हता.
2 तिले दिन व्हतात अनी प्रसुतीसना वेदनासतीन वरडी राहिंती.
3 आकाशमा दुसरं एक रहस्यमय चिन्ह दखायनं; दखा, एक मोठा लाल अजगर दखायना, त्याले सात डोका अनं दहा शिंगं व्हतात, अनी त्याना डोकवर सात मुकुट व्हतात.
4 त्याना शेपटीघाई आकाशमाधला तारासना एक तृतीयांश तारा वढी लिधात अनं त्या पृथ्वीवर फेकात. अनी ती बाई बाळले जन्म दि तवय तिनं बाळ खाई टाकाले पाहिजे म्हणीन तो अजगर त्या बाईपुढे उभा राहीना.
5 मंग ती बाईनी एक पोऱ्याले जन्म दिधा, जो सर्व राष्ट्रसवर लोखंडी दंडाघाई राज्य करी. पण त्या बाळले उचलीन देवकडे अनं त्याना राजासनकडे वर लेवामा वनं.
6 ती बाई वाळवंटमा पळी गयी, तठे तिनं एक हजार दोनशे साठ दिन पोषण व्हवाले पाहिजे, म्हणीसन देवनी तयार करेल तिनी जागा व्हती.
7 तवय स्वर्गमा युध्द व्हयनं; मिखाएल अनं त्याना दूतसनी अजगरसंगे युध्द करं; अनी त्यासनासंगे अजगर अनं त्याना दूतसनी बी प्रतीहल्ला करा;
8 पण अजगर हारी गया, अनी त्याले अनं त्याना दूतसले स्वर्गमा ऱ्हावानी परवानगी राहीनी नही.
9 मंग मोठा अजगरले खाल फेकामा वनं, सर्व जगले फसाडणारा दुष्ट अनं सैतान म्हणेल जुना साप याले अनी सगळा त्याना दूतसले बी खाल पृथ्वीवर फेकामा वनं.
10 तवय मी स्वर्गमा मोठा आवाज ऐका; तो बोलना, “आते तारण, सामर्थ्य अनं राज्य आमना देवनं व्हयेल शे अनं अधिकार त्याना ख्रिस्तना व्हयेल शे; कारण जो आमना भाऊसले अनी बहीणींसले दोष देणारा, आमना देवसमोर रातदिन त्यासनावर दोष आरोप करनारा, तो स्वर्गमाईन खाल टाकामा येल शे.
11 त्यासले त्यानी कोकराना रंगतमुये अनं आपला साक्षना वचनमुये जिंकं अनी त्यासनावर मरणनी येळ वनी तरी त्यासनी आपला जिववर प्रेम करं नही.
12 यामुये स्वर्गसवन अनं त्यामा राहणारासवन, उत्साह करा; पृथ्वी अनं समुद्र, यानावर, अनर्थ ओढायेल शे. कारण आपला काळ थोडा शे अस समजीन भलताच संतापेल सैतान उतरीन तुमनाकडे येल शे.”
13 आपलाले पृथ्वीवर फेकामा येल शे हाई जवय अजगरले समजनं, तवय ज्या बाईनी पोऱ्याले जन्म देयल व्हता तीना पाठलाग करानी सुरवात त्यानी करी.
14 त्या बाईनी आपला जागावर वाळवंटमा उडी जावानं म्हणीन तिले मोठा गरूडना दोन पंख देवामा येल व्हतात; तठे साडेतीन वरीस अजगरपाईन सुरक्षित राहिन तिनं पोषण व्हवाणं व्हतं,
15 मंग त्या बाईनी वाही जावाले पाहिजे म्हणीन त्या अजगरनी तिनामांगतीन नदीनामायक पाणीना प्रवाह आपला तोंडमातीन सोडा.
16 पण बाईले पृथ्वीनी मदत करी; तिनी आपलं तोंड उघडीन अजगरनी आपला तोंडमातीन सोडेल नदी गिळी टाकी.
17 त्यानामुये अजगर बाईवर संतापना अनी देवनी आज्ञा पाळणारा अनं येशुबद्दलनी साक्ष देणारा असा तिना संतानसपैकी बाकीनासनासंगे लढाई कराले तो निंघी गया;
18 अनी तो अजगर समुद्रना किनारवर जाईसन उभा राहिना.