13
दोन श्वापद
नंतर मी एक श्वापदले समुद्रमातीन वर येतांना दखं; त्याले सात डोका अनं दहा शिंगं व्हतात त्याना प्रत्येक शिंगवर एक एक असा दहा मुकुट अनी त्याना डोकावर देवनिंदात्मक नावं व्हतात. जे श्वापद मी दखेल व्हतं ते चित्तानामायक व्हतं, त्याना पाय अस्वलना पायसनामायक व्हतात त्यानं तोंड सिंहना तोंडनामायक व्हतं; त्याले अजगरनी आपली शक्ती, आपलं आसन अनं मोठा अधिकार दिधा. त्याना डोकापैकी एक डोकाले मरण ई अशी जखम व्हयेल माले दखायनी; तरी पण त्यानी ती जखम बरी व्हयनी; तवय सर्व पृथ्वी आश्चर्य करत त्या श्वापदना मांगतीन गयी. अजगरनी श्वापदले आपला अधिकार देयल व्हता म्हणीन त्यासनी अजगरले नमस्कार करा; अनी त्या श्वापदले नमस्कार करतांना बोलनात, “या श्वापदना मायक कोण शे? यानासंगे कोणले लढता ई?”
त्याले मोठमोठ्या अनं देवनिंदक गोष्टी बोलणारं तोंड देयल व्हतं, अनं बेचाळीस महिना त्याले आपला अधिकार चालाडानं काम देयल व्हतं. त्यानी देवविरूध्द, म्हणजे त्यानं नाव, त्याना मंडप अनं स्वर्गनिवासी लोक यासनी निंदा कराले सुरवात करी. देवना लोकससंगे भांडाणं अनं त्यासले जिंकानं काम त्यानाकडे सोपेल व्हतं; अनी सर्व जमात, लोक, भाषा अनं राष्ट्र यासनावर अधिकार देयल व्हता. ज्यानं कोणं नावं जगना स्थापनाना पहिले, “मारी टाकेल कोकराना जिवनी पुस्तकमा लिखेल” शे, त्यासनाशिवाय ज्या पृथ्वीवर राहणारा बाकिना सर्व लोक त्या श्वापदनी आराधना करतीन.
“ज्या कोणले कान शेतस तो ऐको! 10 कैदमा जाणारा तो कैदमा जास; कोणी कोणले तलवारघाई मारस तर त्याले तलवारघाई मरणं भाग शे. यानंवरतीन पवित्र लोकसना धीर अनं ईश्वास दखास.”
11 नंतर मी दुसरा एक श्वापदले जमीनमातीन वर येतांना दखं; त्याले कोकरानामायक दोन शिंगं व्हतात; ते अजगरनामायक बोली राहिंता. 12 तो पहिला श्वापदना सर्व अधिकार त्याना समोर चालाडस अनी ज्या पहिल्या श्वापदनी प्राणघातक जखम बरी व्हयेल व्हती, त्याले पृथ्वीनी अनं तिनावर राहणारा लोकसनी नमन कराले पाहिजे अस करस. 13 दुसरा श्वापद मोठा चमत्कार करस; मनुष्यससमोर आकाशमातीन पृथ्वीवर आग पडाले पाहिजे अस बी करस. 14 ज्या चमत्कार पहिला श्वापदसमोर करानं त्यानाकडे सोपेल व्हतं, चमत्काराघाई तो पृथ्वीवर राहणारा लोकसले फसाडस; अनी जे श्वापद तलवारघाई जख्मी व्हईन वाचना त्याना सन्मानमा मुर्ति बनाडाले पृथ्वीवरला लोकसले सांगस. 15 दुसरा श्वापदना हातमा पहिला श्वापदना मुर्तिमा प्राण घालानी परवानगी देयल व्हतं, यानाकरता की श्वापदना मुर्तिनी बोलाले पाहिजे अनी ज्या कोणी त्या श्वापदना मुर्तिले नमन कराव नही त्यासले मारी टाकाले पाहिजे अशी ती मुर्ति घडाई लई. 16 दुसरा श्वापदनी धाकलामोठा, श्रीमंत अनं गरीब, स्वतंत्र अनं दास, या सर्वा लोकसले आपला उजवा हातवर किंवा आपला कपाळवर त्यानी खुण करी लेवाले भाग पाडं. 17 अनी ज्यासनावर ती खुण म्हणजे त्या श्वापदनं नाव किंवा नावघाई दखाडेल संख्या शे, त्याशिवाय कोणले ईकत लेता येवाले नको किंवा ईकत देता येवाले नको.
18 हाई अक्कलनं काम शे; ज्याले बुध्दी शे त्यानी संख्याना अर्थ काढाणा; त्या संख्यावरतीन मनुष्यना नावना बोध व्हस; अनी ती संख्या सहाशे साहसष्ट शे.
13:1 प्रकटीकरण १७:३,७-१२