15
पीडा लेयल देवदूत
नंतर मी मोठं अनं खुप आश्चर्यकारक अस दुसरं एक चिन्ह आकाशमा दखं, शेवटना सात पीडा लेयल सात देवदूत दखायनात, या पीडा शेवटन्या शेतस कारण त्यासनाद्वारे देवना क्रोध पुर्ण व्हयना.
मंग आग मिसाळेल काचना समुद्रनामायक काहीतरी माले दखायनं, श्वापदवर, त्याना मुर्तिवर अनं त्याना नावना संख्यावर विजय मिळायेल लोक हातमा देवनी वीणा लिसन त्या काचना समुद्रवर उभा राहेल माले दखायनात. त्या देवना दास मोशे अनं कोकरानं गाणं गातांना म्हणतस;
“हे प्रभु देवा, सर्वसमर्थ,
तुनी कृत्ये थोर अनं आश्चर्यकारक शेतस;
हे राष्ट्रसना राजा, तुना मार्ग नितीना अनं सत्य शेतस!
हे प्रभु, तुले कोण घाबराऊ नही?
तुना नावले कोण महिमा देवाव नही?
कारण तुच मात्र पवित्र शे. अनी तुनी न्यायकृत्य सर्वासवर प्रगट व्हयेल शेतस,
म्हणीन सर्व राष्ट्र तुनासमोर ईसन तुनी आराधना करतीन.”
*नंतर मी दखं, तवय साक्षीना मंडपनं स्वर्गमाधलं मंदिर उघडनं. अनी स्वच्छ अनं तेजस्वी तागना कपडा घालेल अनं छातीवरतीन सोनाना पट्टा बांधेल सात देवदूत सात पीडा लिसन त्या मंदिरमातीन निंघनात. त्या चार प्राणीसपैकी एकनी युगानुयुग जिवत राहणारा देवना क्रोधतीन भरेल सोनान्या सात वाट्या त्या सात देवदूतसले दिध्यात. तवय देवनं तेज अनं पराक्रम यासना पाईन निंघेल धुरघाई मंदिर भरी गयं, अनी त्या सात देवदूतसन्या सात पीडा संपापावत कोणले बी मंदिरमा जाता वनं नही.
* 15:5 निर्गम 38:21