16
देवना क्रोधन्या वाट्या
नंतर मी मंदिरमातीन बोलणारा मोठा आवाज ऐका, तो त्या सात देवदूतसले बोलना; “जा देवना क्रोधन्या सात वाट्या पृथ्वीवर वता!”
तवय पहिला देवदूतनी जाईन आपली वाटी पृथ्वीवर ओती तवय त्या श्वापदनी खुण करी लेयल अनी त्याना मुर्तिनी आराधना करनारा लोकसले खराब अनं त्रास देणारा फोड वनात.
मंग दुसरा देवदूतनी आपली वाटी समुद्रमा ओती, तवय समुद्र मरेलसना रंगतनामायक रंगतमय व्हयना अनी त्यामाधला सर्व प्राणी मरी गयात.
मंग तिसरा देवदूतनी आपली वाटी नद्या अनं पाणीना झरा यासमा ओती अनी त्यानं रंगत व्हयनं. तवय मी पाणीना अधिकारी देवदूतले अस बोलतांना ऐकं, “जो तु शे अनं व्हता, जो तु पवित्र शे तु असा न्यायनिवाडा करा तो न्याय योग्य शे! कारण त्यासनी पवित्र लोकसनं अनं संदेष्टासनं रंगत पाडं अनी तू त्यासले रंगत पेवाले भाग पाडेल शे, यानाकरता त्या पात्र शेतस!” नंतर वेदीमातीन येणारा आवाज मी ऐका, “हे, प्रभु देवा, हे सर्वसमर्थ! तुना न्याय सत्य अनं योग्य शेतस!”
मंग चौथा देवदूतनी आपली वाटी सूर्यवर ओती, अनं सूर्यले आगनामायक उष्णताघाई लोकसले जाळी टाकानी सुट देवामा वनी. माणसं त्या कडक उष्णताघाई जळी गयात; तवय त्या पीडावर ज्याले अधिकार शे तवय देवना नावनी निंदा त्यासनी करी अनी त्यासना पापसपाईन फिरीन देवना वैभवनी स्तुती त्यासनी करी नही.
10 मंग पाचवा देवदूतनी आपली वाटी श्वापदना आसनवर ओती तवय त्यानं राज्य अंधकारमय व्हयनं, अनी लोकसनी वेदनासमुये आपली जिभ चाई. 11 आपला वेदनासमुये अनं आपला फोडसमुये त्यासनी स्वर्गना देवनी निंदा करी पण आपला कृत्यसबद्दल पापसपाईन फिरनात नही.
12 मंग सहावा देवदूतनी आपली वाटी फरात महानदीवर ओती अनी नदी सुकी गयी कारण पुर्वेकडतीन येणारा राजासकरता वाट तयार व्हवाले पाहिजे. 13 नंतर मी बेडकसनामायक तीन अशुध्द आत्मा अजगरना तोंडमातीन, श्वापदना तोंडमातीन अनं खोटा संदेष्टासना तोंडमातीन निंघतांना दखात. 14 त्या चमत्कार करनारा भूतसना आत्मा शेतस. त्या तीन आत्मा पुरा जगमाधला राजासले सर्वसत्ताधारी देवना त्या मोठ्या दिनना लढाईकरता एकत्र कराले त्यासनाकडे बाहेर जातस.
15 “ऐका! मी चोरनामायक ईसु! आपण नग्न अस चालाले नको अनं आपली लाज लोकसले दिसाले नको म्हणीन जो जागृत ऱ्हास अनं आपला कपडा संभाळी ठेवस तो धन्य!”
16 नंतर दुष्ट आत्मासनी राजासले इब्री भाषामा अर्मगिदोन म्हणेल ठिकाणवर एकत्र करं.
17 मंग सातवा देवदूतनी आपली वाटी हवामा ओती. मोठा आवाज मंदिरमातीन राजासनपाईन निंघणा तो बोलना, “व्हयनं!” 18 तवय ईजा, ध्वनी अनं मेघगर्जना व्हयनात, शिवाय मोठा भूकंप व्हयना, तो भूकंप ईतला भयंकर व्हता की, पृथ्वीवर माणुस व्हवापाईन ईतला भयंकर कधीच व्हयना नव्हता. 19 मोठा शहरना तीन भाग व्हयनात, सर्व राष्ट्रासना शहर कोसळनात. अनी देवनी मोठ्या बाबेल शहरनं आठवण दंड देवाकरता करी अनी तीले आपला तीव्र क्रोधना द्राक्षरसना प्याला पेवाले लावा. 20 सर्वा बेटं नष्ट व्हयनात, अनी डोंगरसना ठावठिकान राहिना नही. 21 जवळपास चाळीस किलो वजनन्या मोठ्या गारा आकाशमातीन माणुसवर पडण्यात, तवय गारासना पीडामुये लोकसनी देवनी निंदा करी कारण ती पीडा भयानक व्हती.
16:15 मत्तय २४:४३,४४; लूक १२:३९,४०; प्रकटीकरण ३:३ 16:18 प्रकटीकरण ८:५; ११:१३,१९ 16:20 प्रकटीकरण ६:१४ 16:21 प्रकटीकरण ११:१९