17
प्रसिध्द वेश्या
1 नंतर सात वाट्या पकडेल सात देवदूतसपैकी एकजण ईसन मनासंगे बोलाले लागणा, तो बोलणा, “ईकडे ये, म्हणजे बऱ्याच नदीसना जोडे बनाडेल मोठा शहरमा प्रसिध्द वेश्याले शिक्षा कशी व्हई हाई मी तुले दखाडस.
2 तिनासंगे पृथ्वीवरला राजासनी जारकर्म करात अनी तिना जारकर्मरूपी द्राक्षरसघाई पृथ्वीवर राहणारा मस्त व्हयनात.”
3 मंग आत्मानी मना ताबा लिधा तवय देवदूत माले ओसाड प्रदेशमा लई गया, तठे देवनी निंदा करनारा नावसतीन लिखीन भरेल अनी सात डोका अनं दहा शिंगसना लाल रंगना श्वापदवर बशेल एक बाई माले दखायनी.
4 ती बाई जांभळा अनं सेंदूरना रंगना कपडा घालेल व्हती. अनं सोनं, मुल्यवान रत्न अनं मोती यासनी सजेल व्हती. तिना हातमा अमंगळ अनी गंध्यापटक वस्तुसघाई भरेल सोनाना प्याला व्हता.
5 तिना कपाळवर “मोठी बाबेल, सर्व वेश्यासनी अनं पृथ्वीवरली अमंगळपणानी आई,” हाई गुप्त अर्थनं नाव लिखेल व्हतं.
6 ती बाई देवना लोकसना रंगततीन अनं येशुना साक्षीदारसना रंगततीन मस्त व्हयेल माले दखायनी. तिले दखीन माले फार आश्चर्य वाटनं.
7 देवदूत माले बोलना, “तुले आश्चर्य का बर वाटनं?” “ती बाई अनी सात डोका अनं दहा शिंगवाला तिले लई जाणारा श्वापद यासनं रहस्य मी तुले सांगस.
8 जो श्वापद एकदाव जिवत व्हतं पण आते नही ते अथांग डोहमाईन बाहेर ई अनी नष्ट व्हतीन. जवय पृथ्वीवरला राहणारा लोके ज्यासना नाव जिवनी पुस्तकमा जगना उत्पत्तिपाईन त्यासनं नाव लिखेल नही त्या जवय श्वापदले दखतीन तवय त्या आश्चर्यचकीत व्हतीन, त्या एकदाव जिवत व्हतात, आते नही तरी पण त्या परत दखाई.”
9 आठे समजाले बुद्धी अनं ज्ञान पाहिजे. त्या सात डोका म्हणजे सात डोंगर शेतस त्यानावर ती बाई बशेल शे, अनी त्या डोका म्हणजे सात राजा बी शेतस,
10 त्यासनापैकी पाच राजे पडेल शेतस, एक आता राज्य करी राहीना अनी एक अजुन येल नही शे तो येवावर त्याले राज्य कराले थोडाच येळ भेटी.
11 जे श्वापद पहिले जिवत व्हतं पण आते नही, तोच आठवा राजा शे, तो त्या सातस माईनच एक शे अनी त्याना बी नाश व्हई.
12 “ज्या दहा शिंगं तु दखात त्या दहा राजा शेतस, त्यासले अजुन राज्य मिळेल नही तरी त्यासले श्वापदसंगे थोडा येळ राजासनामायक अधिकार मिळस.
13 त्या सर्वा दहाजन एक उद्देशना शेतस अनी ते आपलं सामर्थ्य अनं अधिकार श्वापदले देतस.
14 त्या कोकरासंगे लढतीन, पण कोकरा त्यानी बलायेल, निवडेल अनी ईश्वासु अनुयायी यासनासंगे त्यासले हाराई कारण तो प्रभुसना प्रभु अनी राजासना राजा शे.”
15 आखो देवदूत माले बोलना, “जठे वेश्या बठेल शे, तठे जे जलप्रवाह तु दखात त्या जलप्रवाह म्हणजे राष्ट्र, लोक, वंश अनं येगयेगळा भाषा बोलणारा लोके शेतस.
16 ज्या दहा शिंगं अनं ज्या श्वापद तू दखं, त्या वेश्याना व्देष करी अनं तिले ओसाड अनं नग्न करतीन, तिनं मांस खातीन अनं तीले आगमा टाकीन नष्ट करतीन.
17 त्यासनी एक ईचारतीन वागीसन देवना वचनं पुर्ण व्हस तोपावत आपला राज्यना अधिकार श्वापदले देवानं असा उद्देशतीन कृती करानं अस देवनी त्यासना मनमा घालं.
18 “जी बाई तू पहिले दखी ती पृथ्वीवरना राजासवर राज्य करणारं मोठं शहर शे.”