19
1 यानानंतर स्वर्ग माधला लोकसनी मोठी गर्दीना जशा काय एक मोठा आवाज मी ऐका; तो बोलना, “देवनी स्तुती असो! तारण, गौरव अनं सामर्थ्य ह्या आमना देवना शेतस!
2 कारण त्याना न्याय सत्यना अनं नीतिना शेतस, ज्या वेश्यानी आपला जारकर्मतीन पृथ्वी भ्रष्ट करी तिना न्यायनिवाडा त्यानी करेल शे अनी आपला दाससना रंगतबद्दल तिले शिक्षा करेल शे.”
3 त्या दुसऱ्यांदाव बोलणात, “देवनी स्तुती असो! तिना धूर युगानुयुग वर चढी राहिना!”
4 तवय त्या चोवीस वडील लोक अनं त्या चार प्राणी उपडा पडीन राजासनवर बशेल देवनी आराधना करीसन. बोलणात, “आमेन! देवनी स्तुती असो!”
कोकराना लगीननं जेवण
5 इतलामा राजासनपाईन आवाज व्हयना, तो बोलना, “अहो आमना देवनी भिती धरणारा सर्व धाकलामोठा दाससवन, त्यानी स्तुती करा!”
6 तवय जशा काय मोठी लोकसनी गर्दीना आवाज, बराज जलप्रवाहसना आवाज अनं मोठा मेघगर्जनाना आवाज मी ऐका, तो बोलना, “देवनी स्तुती असो! कारण सर्वसमर्थ प्रभु देव हाऊ आमना राजा शे!
7 आपण आनंद अनं उल्लास करूत अनं त्याना गौरव करू, कारण कोकरानं लगीननी येळ येल शे अनी त्याना नवरीनी स्वतःले सजाडेल शे.
8 तिले तेजस्वी अनं शुध्द असा तागना कपडा नेसाले देयल शेतस, त्या तागना कपडा म्हणजे देवना लोकसना चांगला कृत्य शेतस.”
9 तवय देवदूत माले बोलना, “हाई बी लिख की, कोकराना लगीनना मेजवानीले बलायेल त्या धन्य.” देवदूत माले अस बी बोलना “ह्या देवना सत्यवचनं शेतस.”
10 तवय मी त्यानापुढं गुडघा टेकीसन त्याले नमन करणार व्हतु, पण तो माले बोलना, “अस करू नको! मी तुना संगेना अनी ज्या येशुबद्दल साक्ष देतस त्या तुना भाऊना संगेना दास शे, नमन देवले कर, कारण येशुनी जी सत्यता प्रकट करी, ती संदेष्टाला प्रेरणा देस.”
पांढरा घोडावरला घोडेस्वार
11 नंतर मी स्वर्ग उघडेल अनी तठे एक पांढरा घोडा व्हता. घोडस्वारले ईश्वासु अनी सत्य अस म्हणेत; तो न्यायातीन न्यायनिवाडा करस अनं त्याना युध्द लढस.
12 त्याना डोया आगना ज्वालानामायक शेतस अनं त्याना डोकावर बराच मुकुट शेतस, त्यानावर एक नाव लिखेल शे, ते नाव काय व्हतं त्यानाशिवाय कोणलेच माहीत नही.
13 रंगतमा बुडायेल कपडा त्यानी आंगवर ओढेल व्हतात, अनी “देवना शब्द” हाई त्यानं नाव शे.
14 स्वर्गमाधलं सैन्य पांढरा घोडावर बठीन पांढरा अनं शुध्द असा तागना कपडा घालीन त्यानामांगे चाली राहिंती.
15 त्यानी राष्ट्रासना पराभव कराले पाहिजे म्हणीसन त्याना तोंडमातीन तीक्ष्ण धारनी तलवार निंघस, तो त्यानावर लोखंडी दंडाघाई अधिकार गाजाडी, अनी सर्वसमर्थ देव याना क्रोधरूपी द्राक्षरसनं कुंड तो तोडस.
16 त्याना कपडासवर अनं त्याना मांडीसवर “राजासना राजा अनी प्रभुसना प्रभु” हाई नाव लिखेल शे.
17 नंतर मी एक देवदूतले सूर्यवर उभं राहेल दखं. तो अंतराळना मध्यभागमा उडणारा सर्व पक्षीसले मोठा आवाजतीन बोलना, “या, देवना महान जेवणनी मेजवणीकरता एकत्र व्हा!
18 राजासनं मांस, सरदारसनं मांस, घोडासनं त्यावर बठेल स्वारासनं मांस, स्वतंत्र अनं दास, धाकला अनं मोठा असा सर्व लोकसनं मांस खावाले या.”
19 तवय ते श्वापद, पृथ्वीवरला राजा अनं त्यासनं सैन्य हाई घोडावर बठेल स्वारससंगे अनी त्याना सैन्यसंगे लढाई कराले एकत्र व्हयेल मी दखात.
20 मंग श्वापद धराई गयं अनी त्यानासंगे खोटा संटेष्टा बी धराई गया, त्यानी श्वापदसना समोर चमत्कार करात. या चमत्कारसनामुये ज्यासनावर श्वापदसनं चिन्ह व्हतं अनी ज्यासनी श्वापदसले नमन करं त्यासले बहकायेल व्हतं, श्वापद अनी खोटा संदेष्टा दोन्ही बी जिवतच भडकता गंधरसना अग्नीना सरोवरमा त्यासले टाकामा वनं.
21 घोडावर बठेल स्वारना तोंडमातीन निंघेल तलवारतीन त्यासना सैन्य माराई गयात अनी त्यासनं सर्व पक्षीसनी मांस खाईसन तृप्त व्हयनात.