20
एक हजार वरीस
1 नंतर मी एक देवदूतले स्वर्गमातीन उतरतांना दखं. त्यानाजोडे अथांग डोहनी किल्ली अनी साखळदंड व्हता.
2 त्यानी तो अजगर म्हणजे जुना साप ज्याले दियाबल अनं सैतान म्हणतस त्याले साखळदंडसघाई हजार वरीस बांधी ठेवं.
3 अनी ती हजार वरीस पुरा व्हवापर्यंत त्यानी राष्ट्रसले आखो फसाडाले नको म्हणीन त्याले देवदूतनी अथांग डोहमा टाकी दिधं अनी वरतीन बंद करीसन त्यानावर शिक्का मारा, त्यानानंतर त्याले थोडा येळ सोडाले पाहिजे.
4 नंतर मी राजासनं दखात, जे त्यानावर बठेल व्हतं, त्यासले न्यायनिवाडा कराना अधिकार देयल व्हता; अनी येशु बद्दलन्या साक्षमुये अनं देवना वचनमुये ज्यासना शिरच्छेद व्हयेल व्हता, अनी ज्यासनी श्वापदले अनं त्याना मुर्तिले नमन करेल नव्हतं अनी आपला कपाळवर अनं आपला हातवर त्यानी खुण धारण करेल नव्हती, त्यासना आत्मा बी दखात, त्या जिवत व्हयनात अनी त्यासनी ख्रिस्तसंगे एक हजार वरीस राज्य करं.
5 मरेलसपैकी बाकीना लोक, त्या हजार वरीस पुरा व्हवापावत जिवत व्हयनात नही, हाईच पहिलं पुनरूत्थान
6 पहिला पुनरूत्थानना ज्या भागीदार शेतस त्या पवित्र अनं धन्य शेतस; असा लोकवर दुसरा मरणनी सत्ता नही, तर त्या देवना ख्रिस्तना याजक व्हतीन; अनी त्यानासंगे एक हजार वरीस राज्य करतीन.
सैतानना पराभव
7 त्या हजार वरीस संपानंतर सैतानले कैदमातीन बंधमुक्त करामा ई,
8 अनी सैतान पृथ्वीना चार कोपरामाधला गोग अनं मागोग राष्ट्रसले फसाडाले अनी त्यासले लढाईकरता एकत्र कराकरता बाहेर ई, त्यासनी संख्या समुद्र किनारनी वाळू इतली शे.
9 त्यासनी पृथ्वीना विस्तारवर फिरीन पवित्र लोकसनी छावणी अनं आवडतं शहर यासले वेढा घाला, तवय स्वर्गमातीन अग्नी उतरना अनी त्यानी त्यासले नष्ट करं.
10 त्यासले फसाडणारा सैतानले अग्नीना अनं गंधकना सरोवरमा टाकामा वनं, त्यानामा श्वापद अनं तो खोटा संदेष्टा यासले पहिलेच टाकामा येल व्हतं, तठे त्यासले रातदिन युगानुयुग पीडा भोगनी पडी.
शेवटना न्याय
11 नंतर मोठं पांढरं राजासन अनं त्यानावर बठेल एकजण माले दखायना, त्याना तोंडसमोरतीन पृथ्वी अनं आकाश ह्या पळनात, त्यासनाकरता जागा उरनी नही.
12 मंग मरी जायेल धाकलामोठासले राजासनपुढे उभं राहेल मी दखं, त्या येळले पुस्तकं उघडाई गयात, तवय दुसरं एक पुस्तक उघडाई गयं ते जिवननं व्हतं अनी त्या पुस्तकमा लिखेलप्रमाणे मरेलसना न्याय ज्यासना त्यासना कृत्यसप्रमाणे करामा वना.
13 तवय समुद्रनी आपलामाधला मरेलसले बाहेर सोडं, मृत्यु अनं अधोलोक यासनी आपलामाधला मरेल माणससले बाहेर सोडं अनी ज्यासना त्यासना सर्वासना कृत्यसप्रमाणे त्यासना न्याय करामा वना.
14 तवय मरण अनं अधोलोक यासले अग्नीना सरोवरमा टाकामा वनं, अग्नीनं सरोवर हाई दुसरं मरण.
15 ज्यानं कोण नाव जिवनना पुस्तकमा लिखेल सापडनं नही, त्याले अग्नीना सरोवरमा टाकामा वनं.