21
नवं आकाश अनी पृथ्वी
नंतर मी नवं स्वर्ग अनं नवं पृथ्वी दखी. पहिलं स्वर्ग अनी पहिली पृथ्वी ह्या नष्ट व्हयेल व्हतात अनी समुद्र बी राहिना नही. तवय मी पवित्र शहर, नवं यरूशलेम, देवपाईन स्वर्गमातीन उतरतांना दखं. ते नवराकरता सजाडेल नवरीनामायक व्हतं. अनी मी राजासनपाईन येल मोठा आवाज ऐका, तो असा दखा, “देवनं घर लोकससंगे शे, त्यासनासंगे देव राही, त्या त्याना लोक व्हतीन, अनी देव स्वतः त्यासनासंगे राही अनी तो त्यासना देव व्हई. तो त्यासना डोयासना अश्रु पुशी टाकी; यानापुढे मरण नही; शोक, रडणं, अनं कष्ट ह्या नही ऱ्हावाव कारण जुन्या गोष्टी व्हई गयात.”
तवय जो राजासनवर बठेल व्हता तो बोलना, “आते मी सर्वा गोष्टी नविन करस!” तो बोलना लिख, कारण ह्या वचनं ईश्वसनीय अनं सत्य शेतस. तो बोलना, व्हयनं! मी पहिला अनं शेवटला, सुरवात अनं शेवट शे. मी तीस लागेलसले जिवनना झरानं पाणी पेवाना अधिकार दिसु अनं ते पाणी फुकट दिसु. जो कोणी विजय मिळवस त्याले ह्या गोष्टी मनापाईन मिळतीन, मी त्यासना देव व्हसु अनी त्या मना पोऱ्या व्हतीन. पण अईश्वासु, अमंगळ, खुन करनारा, व्यभिचारी, चेटकी, मुर्तिपुजक, अनं सर्वा लबाड माणसं यासना वाटामा अग्नीनं अनं गंधकनं सरोवर ई, हाईच ते दुसरं मरण शे.
नवं यरूशलेम
नंतर शेवटला सात पीडासघाई भरेल सात वाट्या ज्यासनी हातमा लेयल व्हत्यात असा सात देवदूतसपैकी एक देवदूत मनाकडे ईसन बोलना, “ये, मी तुले नवरी म्हणजे कोकरानी बायको दखाडस.” 10 तवय आत्मानी मना ताबा लिधा, अनं देवदूत माले उंच डोंगरना टोकवर लई गया, अनी त्यानी माले पवित्र शहर यरूशलेम देवपाईन स्वर्गमातीन उतरतांना दखाडं. 11 त्यानाठायी देवनं महिमानं तेज व्हतं, त्यानी कांती अति मुल्यवान रत्ननामायक व्हती, ते स्फटिकनामायक चमकणारा यास्फे खडानामायक व्हतं. 12 ते महान व्हतं, त्याले बारा उंच वेशी व्हत्यात, अनी वेशीसजोडे बारा देवदूत व्हतात. त्या वेशीसवर नावं लिखेल व्हतात; ती इस्त्राएलना संतानसना बारा वंशसनी व्हती. 13 प्रत्येक दिशाले तीन-तीन वेशी व्हत्यात. पुर्वकडे तीन, उत्तरकडे तीन, दक्षिणकडे तीन अनं पश्चिमकडे तीन वेशी व्हत्यात. 14 शहरनी भिंत बारा पायावर व्हती, त्यानावर कोकराना बारा प्रेषितसना नावं व्हतात. 15 जो देवदूत मनासंगे बोली राहिंता त्यानाजोडे, त्याना वेशीनं अनं त्याना भिंतीसनं मोजमाप लेवाकरता सोनाना बोरू व्हता. 16 शहर चौकोन आकारनं व्हतं, त्यानी लांबी जितली व्हती तितलीच त्यानी रूंदी व्हती, त्यानी शहरनं माप बोरूघाई लिधं ते दोन हजार चारशे किलोमीटर भरनं त्यानी लांबी, रूंदी अनं उंची समान व्हती. 17 मंग देवदूतनी भिंतनं बी माप लिधं, ते दोनशे सोळा फुट अनी माणुसना हातघाई एक शे चौरेचाळीस हात भरनं, माणुसना हात म्हणजे देवदूतना हात. 18 ती भिंत यास्फे रत्ननी व्हती, अनी शहर शुध्द काचनामायक शुध्द सोनानं व्हतं. 19 शहरना पायाना खांब येगयेगळा मुल्यवान रत्नसघाई सजाडेल व्हतं. पहिला पायाना खांब यास्फे, दुसरा निळमणी, तिसरा शिवधातु, चौथा हिरवा पाचु. 20 पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकींथ, बारावा पद्मराग असा बारा रत्नसना त्या व्हतात. 21 बारा वेशी बारा मोत्यासन्या व्हत्यात, एक एक वेस एक एक मोतीनी व्हती, शहरमाधला रस्ता पारदर्शक काचनामायक शुध्द सोनाना व्हता.
22 त्यानामा मंदिर मनं दखामा वनं नही, कारण सर्वसमर्थ प्रभु देव अनं कोकरा ह्याच त्या शहरना मंदिर व्हतात. 23 शहरले सूर्यचंद्रना प्रकाशनी गरज नही, कारण देवना तेजघाई ते प्रकाशीत करेल शे, अनी हाऊच कोकरा त्याना दिवा. 24 जग त्याना प्रकाशघाई चाली अनी पृथ्वीवरला राजा आपलं वैभव त्यामा लयतस. 25 तिना वेशी दिनभर उघड्या राहतीन त्या बंद व्हवाऊतच नही; रात तर तठे नहीच. 26 राष्ट्रसनं वैभव अनं प्रतिष्ठा शहरमा लयतीन. 27 त्यानामा कोणतीच निषिध्द गोष्ट अनी अमंगळपणा अनं लबाड बोलणारा माणुस याना प्रवेश व्हवाऊच नही, तर कोकराना जिवनना पुस्तकमा लिखेल लोकसना मात्र प्रवेश व्हई.
21:1 २ पेत्र ३:१३ 21:2 प्रकटीकरण ३:१२