4
खोटा शिक्षक
पण पवित्र आत्मा स्पष्ट सांगस की, येणारा काळमा काही लोके फसाडणारा आत्मासना अनी दुष्ट आत्मासना शिक्षणकडे लक्ष लावामुये ईश्वासपाईन दुर व्हतीन. अस त्या ढोंगी लोकसना खोटापणमुये व्हई, ज्यासनं मन मरी जायेल शे. जसं की जळणारा लोखंड त्या लगीन कराले मनाई करतीन, अनी त्या काही प्रकारनं अन्न खावाले मनाई करतस, पण देवनी हाई जेवण ईश्वासी लोकसकरता बनाडेल शे, कारण त्यासनी उपकारस्तुतीनी प्रार्थना करीसन ते अन्न खावाले पाहिजे, असा ईश्वासी लोके खरं शिक्षणले वळखतस. देवनी तयार करेल प्रत्येक वस्तु चांगली शे. अनी जे देवनं नाव लिसन लेयल शे ते नकारता येस नही. कारण देवनं वचन अनी प्रार्थना ह्यापाईन ते शुध्द व्हस.
येशु ख्रिस्तना चांगला सेवक
ह्या गोष्टीसनी भाऊसले आठवण करी दे. म्हणजेच ईश्वासना वचनतीन अनी ज्या सुशिक्षणले तु धरीसन गया, त्या वचनसनं पोषण करनारा असा तु ख्रिस्त येशुना चांगला सेवक व्हशी. अधर्म अनी आयाबायासन्या गोष्टीसपाईन दुर ऱ्हावानं, अनी सुभक्तीबद्दल कसरत करा. कारण शारिरीक कसरत थोडीच उपयोगी शे, सुभक्ती तर सर्व कामसमा उपयोगी शे, तिले आत्तेनं अनी पुढला जिवननं अभिवचन मिळेल शे हाई वचन सत्य शे, ईश्वसनीय अनी कायम स्विकाराले योग्य शे. 10 यानाकरता आम्हीन श्रम अनी खटपट करतस, कारण जो सर्व लोकेसना अनी विशेष करीसन ईश्वास ठेवणारासना तारणारा, त्या सदाजिवत असा देववर आम्हीन आशा ठेयेल शे.
11 या गोष्टी आज्ञा रूपतीन सांगीसन शिकाड. 12 कोणी बी तुना तरूणपणले तुच्छ मानाले नको. तर तुनं भाषण, प्रेम, तुनं वागणं, अनी शुध्दता यानाबद्दल ईश्वास ठेवणारा लोकसना आदर्श व्हय. 13 मी येस तोपावत वचन वाचामा, प्रचार करामा, अनी शिक्षण देवानं, यासनाकडे ध्यान दे. 14 तुनावर वडील लोकेसनी हात ठिसन संदेशना द्वारा तुले देयल अस कृपादान तुनामा शे त्यानाकडे दुर्लक्ष करानं नही. 15 तुनी प्रगती सर्वासले दखावाले पाहिजे म्हणीसन तु या गोष्टिसनं ज्ञान ठेव अनी यानामा मग्न व्हई जाय. 16 आपलाकडे अनी आपला शिक्षणकडे निट ध्यान दे, त्यानामाच टिकिसन ऱ्हाय, कारण अस करावर तुनं अनी तुनं ऐकी लेणारसनं बी तारण व्हई.