5
ईश्वासी लोकसबद्दल जबाबदारी
वडील लोकसले वरडीन बोलानं नही, तर त्यासले बाप मानीसन, तरूणसले भाऊ मानीसन बोध कर; वयस्कर बायासले माय मानीसन, तरूणीसले बहिण मनीसन, पुर्ण शुध्दतातीन बोध कर.
ज्या खरच विधवा शेतस त्यासना योग्य मान राख. एखादी विधवाले पोऱ्या किंवा नातु व्हतीन तर त्यासनी पहिले आपला घरनाससंगे धर्मनिष्ठ वृत्तीतिन वागीन आपला वडीलसना उपकार फेडाले शिकानं, कारण हाई देवले मान्य शे. जी विधवा शे, अनी एकटीच पडेल शे, तिनी आपली आशा देववर ठेवस, अनी ती रातनं-दिन ईनंती अनी प्रार्थना करस. पण जी विधवा शारिरीक ईच्छा पुरी कराकरता लागेल शे, ती जिवत राहीसन बी मरेल शे. त्यासनी दोष रहीत ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन त्यासले यानामायक वागानी आज्ञा कर जर कोणी आपलासनी अनी विशेष करीसन आपला घरनासनी तरतुद करस नही, तर तो अईश्वासु शे अस व्हस, तो माणुस ईश्वास ठेवनारा माणुसपेक्षा वाईट शे.
जी साठ वरीसना आतमा नही व्हई, अनं ती एकच नवरानी बायको व्हयेल व्हई. 10 जीनं चांगला कामसमुये नाव व्हयेल व्हई, म्हणजे जिनी पोऱ्यासले सांभाळेल व्हई, पाहुणचार करा व्हई, पवित्र लोकसना पाय धोयेल व्हतीन, संकटमा पडेल लोकसले मदत करी व्हई, सर्व प्रकारना चांगला कामे करेल व्हतीन, अस नाव कमाडेल विधवानं नाव यादीमा लिखी लेवाले पाहिजे.
11 तरूण विधवासले यादीमा लेवानं नही, कारण त्या शारिरीक ईच्छा पुरी कराकरता ख्रिस्तले सोडीसन त्या लगीन कराले दखतीन. 12 असासले दंड आज्ञा शे, कारण त्यासनी आपली पहिली प्रतिज्ञा मोडी. 13 अनी त्या घर-घर फिरिसन आळशी व्हतस, इतलंच नही तर त्या कटकट करनाऱ्या अनी लुडबुड्या करनाऱ्या व्हतस, जे बोलानं नही ते बोलतस. 14 यामुये मनी ईच्छा अशी शे की, तरूण विधवासनी लगीन करानं, पोऱ्यासले जन्म देवाना, घर चालाडानं अनी विरोधीसले नाव ठेवाकरता जागा देवानी नही. 15 कितल्या तर भटकिसन सैतानना मांगे निंघी जायेल शेतस. 16 जर कोणी ईश्वास ठेवणारी बाईना आठे विधवा व्हतीन, तर तिनी त्यासनी तरतुद करानी, त्यासना मंडळीवर भार पडु देवाना नही; म्हणजे ज्या खरच विधवा शेतस त्यासले मंडळीले मदत करता ई.
17 ज्या वडील लोके, अध्यक्षतानं मंडळीन काम चांगलं चालाडतस, विशेष करीसन ज्या उपदेश अनी शिक्षण याबद्दल श्रम लेतस त्यासले दुप्पट मजुरी मिळाले पाहिजे. 18 कारण शास्त्र म्हणस, “बैल मळनी करस तवय त्याले मुसकं बांधु नको” अनी “काम करनारा आपला मजुरीकरता योग्य शे.” 19 दोन नही तर तिन साक्षीदार ऱ्हावाशिवाय वडील लोकसवरला आरोपसना खटला लेवाना नही. 20 बाकिनासले भिती वाटाले पाहिजे म्हणीसन पाप करनारासले सर्वासना समोर दोष लावा.
21 देव, ख्रिस्त येशु, अनी निवडेल देवदूत, यासना समोर मी तुले समजाडीसन सांगस, की मनमा हट्ट नही धरता या आज्ञा पाळ, पक्षपात करीसन काही करू नको. 22 उतावळा पणतीन कोणवर बी हात ठेवु नको*, अनी दुसरासना पापना भागीदार व्हवु नको; स्वतःले शुध्द ठेव.
23 अनी यानापुढे नुसतं पाणीच पेत ऱ्हाऊ नको, तर आपला पोटकरता अनी आपला कायमना दुःखनाकरता थोडा द्राक्षना रस ले.
24 कित्येकसना पाप उघडा ऱ्हाईसन बी त्या त्यासना पुढे न्यायनिवाडाले जातस. अनी कित्येकसना त्यासना मांगतीन जातस. 25 त्यानामायक उघडा असा काही चांगला कृत्य शेतस अनी ज्या दुसरा प्रकारना शेतस त्या पण गुप्त राहु शकस नही.
5:18 मत्तय १०:१०; लूक १०:७ * 5:22 हात ठेवु नको म्हणजे दिक्षा देवु नको