6
1 ज्या दास म्हणीन शेतस, त्या सर्वासनी आपआपला मालकले सर्व प्रकारना सन्मानकरता योग्य शेतस अस मानानं, हाई याकरता की देवना नावनी अनं शिक्षणनी निंदा व्हवाले नको;
2 अनी ज्यासना मालक ईश्वास ठेवणारा शेतस, त्यासनी ह्या भाऊ शेतस म्हणीसन त्यासना अपमान कराना नही, तर त्यासनी जास्त सेवा करानी, ज्यासले सेवाना लाभ व्हस त्या ईश्वास ठेवनारा अनी प्रिय शेतस.
खोट शिक्षण अनं खरं-खुरं धन
या गोष्टी शिकाड अनी त्याबद्दल बोध कर.
3 जर कोणी दुसरं प्रकारनं शिक्षण देस, अनी आपला प्रभु येशु ख्रिस्तना ज्या वचनं अनी दैवी शिक्षण मानस नही,
4 तर तो घमेंडी शे, त्याले काहीच समजस नही तो वादविवाद, अनी भांडण यासनामुये येडा बनेल शे, यापाईन हेवा, आपसमाधला, अपशब्द, दुसरासबद्दल कुकल्पना उत्पन्न व्हतस.
5 मंग बिघडेल, अनी सत्यपाईन दुर जायेल ह्यासले धर्म हाई एक कमाईनं साधन शे. अशी कल्पना करनारा माणससमा कायम भांडणं व्हतस.
6 संतोषमा करेल सुभक्ती तर मोठाच लाभ शे.
7 आपण जगमा काहीच आणं नही, तर आपलाले त्यासनामातीन काही लई जाता येवाव नही,
8 जरी आमले जेवण अनी कपडा राहिनात तरी आमले पुरं शे.
9 पण ज्या श्रीमंत व्हवाले दखतस त्या परिक्षामा अनी मनुष्यले नाशमा अनं विध्वंसमा बुडावनारा असा मुर्खपणना अनं नाशवंत वासनासमा सापडतस.
10 कारण पैसासना लोभ सर्व प्रकारना वाईटनं मुळ शे. त्याना मांगे लागीसन कितलातरी ईश्वासपाईन दुर जायेल शेतस, अनी त्यासना मनं बराच दुःखतीन तुटेल शे.
वयक्तीक सुचना
11 हे देवभक्त, तु यानापाईन पय अनी नितिमत्व, सुभक्ती, ईश्वास, प्रिती, धीर अनी नम्रता यासना मांगे लाग.
12 ईश्वासबद्दल जी शर्यत ती कर, युगानुयुगनं जिवन मिळाव, त्यानाकरताच तुले निवडेल शे अनी बराच साक्षीदारस समोर तु ते स्विकारीन मान्य करेल शे.
13 सर्वासले जिवन देणारा जो देव त्याना समोर अनी ज्या ख्रिस्त येशुनी पंतय पिलात समोर तो स्विकार करा त्याना समोर मी तुले समजाडीन सांगस.
14 आपला प्रभु येशु ख्रिस्त प्रकट व्हस तोपावत तु त्यानी आज्ञा निष्कलंक, अनी दोष रहीत ठेव.
15 जो धन्य अनी एकच अधिपती राजासना राजा अनी प्रभुसना प्रभु अनी ज्या एकलेच अमरत्व शे, अनी जो प्रकाशमा ऱ्हास अनी ज्याले कोणताच मनुष्यनी दखेल नही.
16 अनी कोणकडतीन दखास नही, तो ते त्यानं प्रकट व्हवानं अनी पुढला काळमा दखमा ई; त्याले सन्मान अनं युगानुयुगनं सामर्थ्य असो. आमेन.
17 चालु युगमाधला धनवानसले सांग की, तु अभिमानी व्हवानं नही, चंचल धनवर आशा ठेवानी नही, तर जो सदाजिवी देव आपलाले उपभोगाकरता सर्वकाही भरपुर देस त्यानावर आशा ठेवानी.
18 त्यासले आज्ञा दे की, चांगलं ते करानं, चांगला कामबद्दल धनवान ऱ्हावानं, दानशील, मदत कराले नेहमी तयार ऱ्हावानं.
19 जे खरं जिवन ते भेटाकरता पुढला काळमा चांगला आधार व्हई अशी साठवण आपण करानी.
20 हे तीमथ्य, तुले स्वाधीन करेल ठेव सांभाळ; अधर्मन्या रिकाम्या वटवटी अनी जीले विद्या हाई नाव चुकीसन देयल शे, अनी विरोध करणाऱ्या गोष्टीसपाईन दुर ऱ्हाय.
21 काही लोकसनी असा दावा करेल शे की त्यासले हाई ज्ञान शे, पण त्या ईश्वासतीन भटकी जायेल शेतस.
देवनी कृपा तुमनासंगे राहो.