2
येशु ख्रिस्तना खरा सैनिक
मना पोऱ्या, प्रभु येशु ख्रिस्तमा जी कृपाद्वारा जी एकता आपलामा शे, त्यामा बलवान व्हत जा. जी शिकवण मना साक्षीदारस समोर मनापाईन ऐकी ती त्या असा ईश्वासु माणससले सोपी दे ज्या दुसरासले शिकाडाकरता योग्य शे.
ख्रिस्त येशुना चांगला शिपाई ह्या नातातीन मनासंगे दुःख भोग. जो माणुस शिपाई ऱ्हास, तो संसारना कामसमा अडकस नही ह्यानाकरता की ज्यानी त्याले सैन्यमा भरती करी लियेल शे. त्याले त्यानी संतुष्ट करानं. जर कोणी शर्यतमा पळस तर तो नियमप्रमाणे करस नही तर त्याले बक्षिस भेटस नही. श्रम करनारा शेतकरीनी पहिले पिकना वाटा लेवानं योग्य शे. जे मी बोलस ते समजिले, कारण प्रभु तुले सर्व गोष्टी समजाडी दी.
हाई मनी सुवार्तानामायक मरेल मातीन ऊठाडेल येशु ख्रिस्त, जो दावीदना वंशमातील शे ह्यानी आठवण ठेव. ह्या सुवार्तामुये मी दुष्कर्म करनारासना मायक बेड्यासनं बी दुःख भोगी ऱ्हायनु तरी देवना वचनले बेडी पडेल नही. 10 ह्यामुये मी निवडेल लोकसले बी ख्रिस्त येशुमातील तारण युगानुयुग गौरव प्राप्त व्हवाले पाहिजे म्हणीसन मी त्यानाकरता सर्वकाही धीरतीन सहन करस. 11 हाई वचन ईश्वसनीय शे की, आपण त्यानासंगे मरणुत तर त्यानासंगे जिवत बी ऱ्हासुत. 12 जर आपण धीरतीन सहन करसु तर त्यानासंगे राज्य बी करसुत. आपण त्याले नकारसुत तर तो बी आपले नाकारी. 13 जरी आपण अईश्वासी व्हयनुत, तरी तो ईश्वासनीय ऱ्हास कारण त्याले स्वतःविरुध्द वागता येस नही.
उत्तम कामगार
14 तु ह्या गोष्टीसनी त्याले याद करी दे, त्यासले प्रभुसमोर ताकिद दिसन सांग की, शब्द युध्द करानं नही. ते कसाना बी उपयोगमा नही पडतस ऐकनारासना नाशना कारण व्हतस. 15 तु सत्यनं वचन निट सांगनारा, लाज वाटेल अस कोणतं बी काम न करनारा, देवना पसंतिले उतरेल कामकरी, असा स्वतःले सादर कराकरता व्हई तितलं कर. 16 अनितीना रिकामी कटकट पाईन दुर ऱ्हाय असा कटकट करनारा अभक्तिमा जास्त वढाई जातीन. 17 अनी ज्यानं शिक्षण उघडी जखमंना मायक व्हई, त्याना मायक हुमनाय अनी फिलेत ह्या शेतस. 18 त्या सत्यना विषयी चुकी जायेल शेतस, पुनरूत्थान व्हई जायेल शे अस त्या म्हणतस अनी कित्येकसना ईश्वासना त्या नाश करतस. 19 तर देवनी घालेल स्थिर पाया टिकिसन ऱ्हास त्यावर हाऊ शिक्का मारेल शे, प्रभु आपला ज्या शेतस त्यासले वळखस, अनी जो कोणी प्रभुन नाव लेस तो अनितीपाईन वाची ऱ्हास. 20 मोठा घरसमा फक्त सोनाना अनी चांदिना भांडा राहतस अस नही, तर लाकुडना अनी मातिना बी ऱ्हातस, तर त्यासना माधलं कित्येक चांगला कार्यसमा उपयोग करतस, तर काही फक्त कार्यकरता व्हस. 21 म्हणीसन जर कोणी त्यानापाईन दुर ऱ्हाइसन स्वतःले शुध्द करस तर तो पवित्र करेल स्वामीले उपयोगमा पडनारा, प्रत्येक चांगला कामले उपयोगमा पडनारा मानपाननं भांडं व्हई. 22 तरूणपणना वासनासपाईन दुर पय, अनी शुध्द मनतिन प्रभुना नाव लेनाराससंगे नितिमत्व, ईश्वास, प्रिती, शांती, ह्यासना मांगे लाग. 23 मुर्खपणन्या अनी अज्ञानसना वादन्या गोष्टीसपाईन दुर ऱ्हाय, कारण त्यासपाईन भांडणं तयार व्हतस हाई तुले माहित शे. 24 प्रभुना दासनी भांडण नही, तर त्यानी सर्वासनासंगे नम्रमा, सहनशीलतामा अनं शिकाडाकरता तयार रावाले पाहिजे. 25 विरोध करनारासले नम्रतातीन शिकाडनारा असा ऱ्हावाले पाहिजे. कदाचित देव त्यासले सत्यनं ज्ञान व्हवाले पश्चतापनी बुध्दी दी 26 अनी सैताननी त्यासले धरीन ठेवानंतर त्या त्यानापाईन सुटीसन देवनी ईच्छा पुरी कराले शुध्दीमा येतीन.
2:12 मत्तय १०:३३; लूक १२:९