3
शेवटला दिन
1 हाई समजी ले, शेवटला काळमा कठीण दिन येतीन,
2 कारण माणुस स्वार्थी, पैसासना लोभ धरनारा, बडाईखोर, गर्विष्ट, निंदा करनारा, माय बापले नही माननारा, उपकारसले नही जाणनारा, अपवित्र,
3 ममताहिन, क्षमा नही करनारा, चुगलखोर, असंयमी, क्रुर, चांगलास बद्दल प्रेम नही करनारा
4 ईश्वासघात करनारा, गर्वतिन फुगेल, देववर प्रेम करापेक्षा सुखविलासनी आवड करनारा
5 सुभक्तीनं बाहेरनं रूप दखाडीसन तिना स्वतःवर संस्कार नही असा लोकसपाईन बी दुर रहा.
6 त्यानामातिन असा काही लोके शेतस की ज्या घरमा बागेच घुशीसन पापदोषतीन भरेल अनेक प्रकारना वासनानी बहकेल,
7 असा भोळ्या बायासले कायम शिकतस पण सत्यना ज्ञानले कधीच समजु शकस नही.
8 यान्नेस अनी याब्रेस यासनी जसं मोशेले आडावं तसा ह्या माणसे सत्यले आडावतस, ह्या लोके भ्रष्ट बुध्दी व्हयेल अनी ईश्वासबद्दल अपयशी व्हयेल असा त्या शेतस.
9 तरी बी त्या यानापुढे जावु शकावुत नही. कारण जसं त्यासनं मुर्खपण उघड व्हयेल शे. तसं यान्नेस अनी याब्रेस यासनासंगे बी व्हयनं.
शेवटनी सुचना
10 तु मना शिक्षणना आचरण, संकल्प, ईश्वास, सहनशीलता, प्रिती, धीर, मना व्हयेल छळ, मनावर येल संकट हाई वळखीन शे.
11 माले अंत्युखियामा, इकुनियोमा, अनी लुस्त्रात, जे काही व्हयनं अनी मी जो छळ सहन करा ते तु वळखीन शे, त्या सर्वासमातिन माले प्रभुनी सोडायेल शे.
12 ख्रिस्त येशुमा सु-भक्तीतीन आयुष्यक्रम कराले ज्या दखतस, त्या सर्वासना छळ व्हई;
13 अनी दुष्ट, भोंदु मनुष्य, ह्या दुसरासले फसाडिसन अनी स्वतः फशीसन दुष्टपणमा जास्तीच बिघडी जातीन.
14 तु तर ज्या सत्य गोष्टी शिकनास अनी ज्याबद्दल तुनी खात्री व्हयेल शे. ते धरीन ऱ्हाय अनी ते कोणापाईन शिकना
15 अनी धाकलपण पाईन तुले पवित्र शास्त्रनी माहीती शे, हाई माले माहित शे. ते ख्रिस्त येशु मातला ईश्वासनाद्वारा तुले तारणकरता ज्ञानी कराकरता समर्थ शे.
16 प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, दोष दखडानं, सुधारनुक, नितीशिक्षण, ह्यानाकरता उपयोगी शे.
17 ह्यानाकरता की देवना भक्त पुरा व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तयार व्हवा.